MPSC Job Mitra (www.mpscjob.in) वेबसाईट वापरण्यापूर्वी कृपया खालील नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा. या वेबसाईटचा वापर करून तुम्ही या नियमांचे पालन करण्याचे मान्य करता.
१. वेबसाईटचा वापर (Use of Website) ही वेबसाईट केवळ शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सरकारी नोकरी अपडेट्स पुरवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. युजर्स या माहितीचा वापर वैयक्तिक अभ्यासासाठी आणि माहितीसाठी करू शकतात.
२. बौद्धिक संपदा (Intellectual Property) www.mpscjob.in वरील सर्व ओरिजिनल मजकूर, लेख आणि ब्लॉग्स हे ‘MPSC Job Mitra’ ची मालमत्ता आहेत. आमच्या परवानगीशिवाय या वेबसाईटवरील कोणताही मजकूर कॉपी करून इतरत्र व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यास सक्त मनाई आहे.
३. माहितीची अचूकता आणि जबाबदारी : आम्ही भरती प्रक्रिया, जाहिराती आणि अभ्यासक्रमाची माहिती अधिकृत सरकारी नोटिफिकेशनवरूनच देतो. तथापि, कोणत्याही अर्जाची प्रक्रिया करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी अधिकृत सरकारी वेबसाईटवर (Official Notification) माहितीची खात्री करून घेणे बंधनकारक आहे.
४. तिसऱ्या पक्षाच्या लिंक्स (Third-Party Links) : आमच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अधिकृत पीडीएफ डाऊनलोड किंवा अर्ज भरण्याच्या लिंक्स (External Links) दिलेल्या असतात. या बाह्य वेबसाईटवर घडणाऱ्या कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी आमची वेबसाईट जबाबदार राहणार नाही.
५. नियमांमध्ये बदल : ‘MPSC Job Mitra’ ला पूर्वसूचनेशिवाय या नियमांमध्ये कधीही बदल करण्याचा पूर्ण अधिकार आहे.